तपोवनातील 1 झाड तुटलं तरी सगळ्या नाशिककरांनी रस्त्यावर उतरल पाहिजे. तुमच्या पुढच्या 100 पिढ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे.
📍तपोवन , नाशिक
वृक्षतोडी प्रकरणी तपोवन चळवळीतील मूळ आंदोलकांशी चर्चा करावी, चार दोन टाळके म्हणजे तपोवन चळवळ नव्हे!
‘तपोवन वाचवा, नाशिक वाचवा’, ‘तपोवन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘दादागिरी नाही चलेगी’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणांनी आज तपोवन परिसर दुमदुमून गेला.
“तपोवन वाचवा ही चळवळ अजून संपलेली नाही. तपोवनाला अधिकृत वनाचा दर्जा मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.”
आंदोलनात नाशिकचे लोकप्रिय कलाकार विशाल पाटील हे गेल्या ९६ दिवसांपासून सातत्याने उपस्थित राहून नागरिकांच्या लढ्याला पाठिंबा देत आहेत.
📍नाशिक
नाशिकच्या नद्या प्रदूषणामुळे मानवी जिवन धोक्यात आले असून शेतीसाठी वापरात येणारे पाणी रासायनिक पदार्थ समावेशक असल्याने नागरिकांना आजार होत आहेत.
नद्या प्रदूषण मुक्त झाल्या तर त्याचा मानावी जिवांना, तसेच परिसंस्था यांना उपयोग होईल.
विकास शाश्वत असावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.
📍तपोवन , नाशिक
तपोवन वाचवा’ आंदोलनाचा९६ वा दिवस; वनाचा दर्जा मिळेपर्यंत लढा सुरूच
‘तपोवन वाचवा, नाशिक वाचवा’, ‘तपोवन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘दादागिरी नाही चलेगी’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणांनी आज तपोवन परिसर दुमदुमून गेला.
“तपोवन वाचवा ही चळवळ अजून संपलेली नाही. तपोवनाला अधिकृत वनाचा दर्जा मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.”
आंदोलनात नाशिकचे लोकप्रिय कलाकार विशाल पाटील हे गेल्या ९६ दिवसांपासून सातत्याने उपस्थित राहून नागरिकांच्या लढ्याला पाठिंबा देत आहेत.
📍नाशिक। स्वच्छता अभियान
चला नाशिककर , आपल्या सर्व नाशिककरांच्या आरोग्यासाठी आपण एकत्रित येऊन एक पाऊल पुढे टाकू या.
स्वच्छ नाशिक , सुंदर नाशिक.
नाशिक शहर स्वच्छता अभियानाचा होऊया.
चला नाशिक बदलूया .. नाशिक सर्वांत स्वच्छ शहर बनवूया..
📍नाशिक, पर्यवारणीय चिंतन बैठक
नाशिक शहर -जिल्ह्यात पर्यावरणीय समतोल राहून नाशिक शहराचा/जिल्हाचा विकास व्हावा यासाठी हा अट्टाहास.
मा. रमेश अय्यर यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ठ विधिज्ञ श्रीराम पिंगळे ह्यांच्या उपस्थितीत तसेच मा. मंत्री महेदय, शासन -प्रशासन यांच्याशी नाशिक शहर जिल्ह्यातील पर्यावरणमित्र संवाद साधणार आहेत.
जिल्ह्याची तापमान गुणवत्ता आणि हवेची गुणवत्ता यासाठी चिंतन बैठक होतं आहे.
गोदावरी नदी व तिच्या उपनद्या यासारख्या अनेक पर्यवरणीय बाबींवर सखोल चर्चा होणार आहे.
📍नवी मुंबई । तपोवन / वनमंत्री भेट
वनमंत्री गणेश नाईक यांची तपोवन वाचवा आंदोलकांसोबत चर्चा - एका सुरात म्हणाले जय श्रीराम!
"तपोवन वन म्हणून घोषित करण्याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांची सकारात्मक भूमिका”
नवी मुंबईचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मा. श्री. गणेश नाईक यांची तपोवन विषयावर रोहन देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत नवी मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
तपोवन वाचविण्यासाठी तसेच त्याला वनाचा दर्जा मिळावा यासाठी संविधानिक मार्गाने योग्य ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असा ठाम विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी आंदोलक रोहन देशपांडे यांना दिला.
गोदावरी नदी व तिच्या उपनद्या यासारख्या अनेक पर्यवरणीय बाबींवर सखोल चर्चा होणार आहे.
📍तपोवन , नाशिक
दिवस 20 वा.
झाडे वाचवा,तपोवन वाचवा.
झाडे वाचवा, तपोवन वाचवा — ही हाक आता आणखी जोरात घुमू लागली आहे!
📍तपोवन , नाशिक
दिवस १९ वा.
झाडे वाचवा,तपोवन वाचवा.
झाडे वाचवा, तपोवन वाचवा — ही हाक आता आणखी जोरात घुमू लागली आहे!
मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता
श्री. संतोष जुवेकर यांनी स्वतः तपोवनात येऊन “झाड हलवू नका, झाड वाचवा” अशी ठाम भूमिका घेतली.
त्यांच्या या जिंदादिलीचा, या धडाडीचा आणि निसर्गासाठीच्या निखळ प्रेमाचा नाशिककर सदैव मान ठेवतील.
तपोवनच्या रक्षणाच्या लढ्यात त्यांची ही उपस्थिती नाशिककर कधीही विसरणार नाही! 🌳💚✨
लोक राजकीय कारणासाठी पर्यावरणवादी झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं विधान
हे समस्त पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचा अवमान करणारं आणि त्यांची खिल्ली उडवणारं आहे.
एकीकडं ठेकेदारांचं बिऱ्हाड जगवण्यासाठी हजारो झाडांवर कुऱ्हाड चालवण्याची चूक करायची
आणि त्याला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अवमान करायचा हे सरकारला शोभत नाही.
दुसऱ्या बाजूला राजकीय पर्यावरणाचा विचार न करता तपोवनातील वृक्षतोडीसंदर्भात मा. अजितदादांनी घेतलेली भूमिका ही निश्चितच स्वागतार्ह आहे.
त्यांच्या या भुमिकेमुळं तपोवनातील वृक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना नक्कीच बळ मिळेल!
पहिली कुऱ्हाड माझ्या छाताडावर जरी मारली आणि माझा निधन झालं तरी मला चालेल, पण तपोवनातील झाडांची कत्तल नको 🙏 - रोहन देशपांडे
मला माराल, तर तुम्ही मराल.. झाडे वाचवा.. तपोवन वाचवा..
नाशिककरांच्या एकजुटीचा विजय असो..🫡🪴 आपला आवाज मुंबईत पोहोचला.. दिल्लीलाही कुणकुण लागली.. 👍 जय तपोवन .. जय श्रीराम!🪴 झाडे वाचवा- तपोवन वाचवा.
Sayaji Shinde Nashik Tapowan : एकही झाड तोडून नका,तोडल्यास माफी नाही; सयाजी शिंदेंचा इशारा
एवढा सामान्यांचा जनसमुदाय एका ध्येयासाठी पर्यावरण टिकवण्यास जेव्हा एकत्र येतो- समाधान वाटल.
आजच्या सुनावणीला नाशिककरांनी दिलेला तुडुंब प्रतिसाद पाहून हृदय भरून आलं.
तपोवनाच्या पवित्रतेला आणि प्रभू श्रीरामांच्या चरणपावलांनी पावन झालेल्या या भूमीच्या संरक्षणासाठी नाशिककरांची ही उभी एकजूट—खरंच वंदनीय आहे.
पर्यावरण अबाधित राहील, तपोवनाचं संतुलन टिकून राहील यासाठी हीच एकता कायम ठेवूया.
नाशिककरांच्या या सामूहिक जागृतीला मनापासून सलाम.
मा.गिरीशभाऊ , Girish Mahajan खरतर आपण ज्या तत्परतेने तपोवन वृक्षतोडीसंदर्भात दखल घेतली त्याबद्दल समस्त नाशिककरांना आपला responsible approach वाटला त्याबद्दल धन्यवाद! परंतू आपण बोलल्याप्रमाणे झाडांच्या बाबतीत सर्व पर्यावरण प्रेमी नाशिककराच्या उपस्थितीत open discussion करून , तपोवन येथे पुढचा निर्णय घेतला तर नक्कीच संघर्ष होणार नाही.
तरी आपण दिलेला शब्द पाळाल अशी अपेक्षा.
झाड तोडणे हा शेवटचा पर्याय असावा. कळावे !आपला नम्र,,,
Born and raised in a working-class family, learning the value of hard work and community.
Graduated with honors from State University with a degree in Political Science.
Started grassroots initiatives to improve local schools and public safety.
Elected to City Council, championed affordable housing and green spaces.
Served in state legislature, passed landmark education funding reform.
Became party leader, focusing on healthcare access and economic equality.
Led successful campaign to increase education funding by 40%, benefiting over 500,000 students.
Expanded healthcare coverage to 100,000 previously uninsured citizens.
Attracted major investments creating 15,000 new jobs in our state.
Implemented state program providing debt relief to 25,000 graduates.
Always putting people first and maintaining the highest ethical standards.
Open communication and accountability in all decision-making processes.
Ensuring every voice is heard and every community is represented.
Working tirelessly for positive change and innovative solutions.
Together, we can build a future that works for everyone. Your support and involvement make all the difference.
Get Involved Today